पुस्तक परिचय | मनवा, लेखक: पु. शी. रेगे.





मैत्री, प्रेम, विवाह यातील एका तरी शब्दाचा अर्थ तुम्ही स्वानुभवातून शोधून पाहिला आहे का? या पुस्तकातील कथांतून मानवी संबंधातील गुंतागुंत नाजूकपणे उल्गडली आहे. दोन व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांच्याकडे केवळ लिंगाच्या दृष्टिकोनातून स्त्री व पुरुष म्हणून न पाहता दोन व्यक्तींच्या मनातील भावनांचे (आणि विचारांचे) तरंग एकत्र आल्यावर काय घडेल याची रंजक मांडणी या लघुकथांद्वारे लेखकाने सादर केली आहे.

सुरुवातीच्या काही कथा वाचल्यावर वरकरणी या केवळ स्त्री पुरुष प्रेम संबंध दाखवणाऱ्या आहेत म्हणू मनात गुदगुल्या होण्याची शक्यता आहे. मात्र पुढे वाचन करता या केवळ काल्पनिक गोष्टी नाहीत अशी खात्री पटू लागते. यातील एका तरी पात्रात तुम्हाला कुणी ओळखीचे भेटेल. हे छोटेसे दिसणारे पुस्तक वाचल्यानंतरच पुन्हा एकदा आपल्या कथेला सुरुवात होते आणि शोध सुरू होतो तो खऱ्या खुऱ्या नात्यातील रंगांचा.

मैत्री, प्रेम, विवाह अशा शब्दांचा बऱ्याचदा आपण वैयक्तिक विचार न करता समाजातील रूढ अर्थ स्वीकारून मोकळे होतो मात्र रोजच्या जगण्यातून तयार होणाऱ्या प्रसंगाना तोंड देताना या शब्दांचे अधिक दाट होणारे अर्थ आपल्याला उलगडू लागतात आणि जाणीव होते की ही नाती या शब्दांत मावणारी नाहीत. पुस्तकाच्या अखेरीस येता येता तुम्हाला या शब्दांचा स्वतःचा असा एक अर्थ सपडल्याशिवय राहणार नाही. 

पु. शी. रेगे यांची इतर पुस्तकं वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा:
१. मातृका: Matruka (Kindle edition)

२. अवलोकिता: Avalokita (Kindle edition)

३. रेणू: Renu (Kindle edition)


माझ्या आगामी साहित्याबद्दलचे अपडेट्स मिळवा  | Receive updates about my upcoming work
Join me on: Whatsapp / Telegram  

Comments