मराठी कविता: परिमळ





परिमळ

तांबडं फुटल्यावर
सारवलेल्या जमिनीचा परिमळ.
दिवस चढू लागल्यावर
झाडांच्या सावलीत उमलणाऱ्या फुलांचा दरवळ. 
भर दुपारच्या बेदरकार उन्हात
वाळलेल्या तणाचा उच्छ्वास.
तिन्ही सांजेला 
समुद्रकिनारी रेंगाळणारी खारी हवा.
चंदेरी प्रकाशात
दवात न्हालेल्या मातीचा घमघमाट.
विकतच्या अत्तरांपलीकडल्या 
सुगंधांचे जग तुला मला खुणावते आहे. 

- हेरंब सुखठणकर


- The Last Nomad
Check out books from the Insight Stories webstore.

Comments