
My rating: 4 of 5 stars
धारपांच्या कथांवर आजवर बऱ्याच दूरदर्शन मालिका, चित्रपट आणि नाटके बेतली आहेत. तरीही त्या कथा मूळ स्वरुपात वाचण्याचा आनंद वेगळाच आहे. मराठी साहित्यात भय कथा किंवा गूढ कथा लिहिणारे लेखक फार कमी आहेत. त्यात अशा साहित्याकडे पाहण्याचा इतर लेखकांचा, टीकाकारांचा आणि वाचकांचाही दृष्टीकोन वेगळा असतो. या साहित्याला पुष्कळदा सामान्य किंवा लोकप्रिय साहित्य समजून दुय्यम दर्जा दिला जातो.
पण गूढ कथा लिहिण्याचा उद्देश केवळ वाचकाच्या मनात भीती निर्माण करणे हाच समजलो तर ते योग्य ठरणार नाही. धारपांच्या "काळी जोगीण" या कथेविषयी इतके नक्कीच सांगता येईल कि भीती च्या कक्षा ओलांडून, ही कथा तुम्हाला तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींचा पुन्हा एकदा तर्काच्या आधारावर पडताळून पाडण्यास भाग पडेल.
View all my reviews
Comments