एक होती चिऊ ताई. भर दुपारी सूर्य माथ्यावर आलेला असताना तिला तहान लागली. पण या चिउचि होती एक समस्या. तिच्या एका पंखाला दुखापत झाल्यामुळे तिला काही उडता येत न्हव्त. चिऊ ताई एकटीच राहत असे कारण तिचं लग्न अजून झालं न्हव्त. नक्की तहान कशी भागवायची या विवंचनेत असताना तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. काही विचारांनी ती इतकी भयभीत झाली की तिला आपला शेवट जवळ आला असंच वाटू लागलं.
चिऊताई बसलेल्या त्या
चिकूच्या झाडावर नुकतीच फळे
लागायला सुरुवात झाली होती.
त्यामुळे चिकूचा गोड रस
चाखायला अजून काही
मुंग्यांची वर्दळ सुरु झाली
न्हवती. अचानक चिऊताईच्या घरट्यात
एक भला मोठा
पानाचा द्रोण येउन पडला.
घाबरलेल्या चिऊताईची भीती अधिक
बळावली. वरच्या फांदीवर पाहता
तिला काही मुंग्या
खाली येताना दिसल्या.
आता ह्या मुंग्या
नक्की आपल्याला मारणार
असा तिचा समज
झाला.
जसजशा त्या मुंग्या
जवळ येऊ लागल्या
तसे चिऊ ताईने
आपले डोळे घट्ट
मिटून घेतले. काही
क्षण कोणतीच हालचाल
न जाणवल्याने तिने
हळूच एक डोळा
उघडून पहिले तर
मुंग्यांची एक लांबच
लांब रांग एक एक
पाण्याचा थेंब घेऊन
येत होती आणि
त्या पानाच्या द्रोणात
रिता करत होती.
पाहता पाहता तो
द्रोण पाण्याने भरून
घेला आणि चिऊताईची
तहान भागली.
काही दिवसापूर्वी याच मुंग्यांना
अन्नाचा तुटवडा असताना नकळतपणे
चिउताइच्या चोचीतून काही गव्हाचे
दाणे पडले होते.
ह्या नकळतपणे केलेल्या
उपकाराची जाणीव त्या मुंग्यांनी
राखली होती. चिऊताईला
मात्र हा चमत्कारच
वाटला होता.
- हेरंब
· · ────── ꒰ঌ·✦·໒꒱ ────── · ·
माझ्या आगामी साहित्याबद्दलचे अपडेट्स मिळवा | Receive updates about my upcoming work
Comments