There is no pain equivalent to the situation when your beloved hurts you and wants to stay away. But what does one do when pain itself longs for our company and fears the separation?
वेदनेच्या अंकुशाने
घाव जखमेवरी केला
वीण सुटली क्षीण झाला
तूच गुंफलेला शेला
मी म्हणालो वेदनेला
हाय तू रडतेस का
ती म्हणाली सांग कितीदा
दुखः हे नशिबी तुझ्या
होतो नकोसा हा दुरावा
जर भेट तुझी घडणार नाही
मी म्हणालो कर वार घातकी
तिने स्वतःवर वार केला
- हेरंबISupportNAAM
Comments
If you would like to read Marathi Short Stories you can get your copy of मेंढी, वॉचमन व इतर लघुकथा here http://imojo.in/4kzao4