प्रेमानंद गज्वी लिखित किरवंत [Marathi Book Summary]

किरवंत किरवंत by Premanand Gajvi
My rating: 0 of 5 stars

जातीच्या नावाने वर्षानुवर्षे होणारे राजकारण वगळले तर, जातीबद्दल कुतूहल असणार्यापैकी मी आहे. नाही, जातीभेद वगैरे मानण्यासाठी नव्हे तर मुळात विशिष्ट जात म्हटली की एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडते म्हणून. आपण मराठीत क्लासिफिकेशन म्हणतो तेच काम जात करते. नंतर आपल्या करंटेपणामुळे ती नासली.

आपल्यातल्या भेदांचा आनंद घेण्याची संधी जात देते. आता संगीत आणि खाद्यसंस्कृतीचंच उदाहरण घ्या ना. गायकाचा आवाज विशिष्ट जातीचाच असला की आपल्याला खूप भावतो. आज भाजी मिळून नाही आली, भाजीची जात वेगळी होती असं आधीच्या पिढीत सहज म्हटलं जायचं. रंगाची जात, कापडाची जात, मातीची जात अशा असंख्य ठिकाणी ही जात अवतरते. हा शब्दप्रयोग करताना मुळीच कोणतीही अस्पृश्यतेची पुसटशीही भावना नाहीये. तुमच्या माझ्यातल्या गुणांचे वेगळेपण स्वीकारण्याचा मोकळेपणा मात्र नक्कीच आहे. तुम्ही आम्ही सगळे समान असा बेगडी आविर्भाव मुळीच नाहीये.

पण ह्याच भेदांचा आधार घेऊन जेव्हा एखाद्याचे अधिकार डावलले जातात तेव्हा रूप घेतं किरवंत सारखं वेगळ्याच धाटणीतलं नाटक.

View all my reviews

Comments